Navratri: पंतप्रधान असताना दिला मुलीला जन्म, वाचा जसिंडाची प्रेरणादायी कहाणी

पंतप्रधान पदाची जबाबदारी पेलत मुलीला दिला जन्म, जसिंडा अर्डर्नांची प्रेरणादायी कहाणी वाचा.
Navratri
Navratrisakal

जगाच्या पाठीवर आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपली बाजी मारत आहे. स्वत:चं अस्तित्व शोधत आहे. नवरात्रीनिमित्त आम्ही तु्म्हाला अशाच नावाजलेल्या कर्तृत्वान महिलांसंदर्भात सांगतोय. आज आपण अशा महिलेविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांचं गेली काही वर्षांपासून जागतिक राजकारणात आघाडीच्ं नाव आहे. होय, जसिंडा अर्डर्न न्युझिलंडच्या पंतप्रधान ज्या चाळीसाव्या वर्षी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्या.

नव्या पिढीतून नेतृत्व घडवायचं असेल तर स्वत:चा स्वतंत्र मार्ग स्वत:च निर्माण करावा असं ठामपणे सांगणाऱ्या जसिंडा अर्डर्न एक कर्तृत्वान महिला म्हणून जगप्रसिद्ध आहे.

Navratri
Navratri 2022 : सायंकाळच्या स्नॅक्ससाठी ट्राय करा पनीर टिक्की

२०१७मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदी निवडून आल्या होत्या तेव्हा पासून त्या लेबर पार्टीच्याही प्रमुखपदी आहेत. पंतप्रधान पद असो की पार्टीचं प्रमुखपद त्यांनी नेहमी त्यांची भूमिका चोख बजावली.

जसिंडा यांचा जन्म हॅमिल्टनमध्ये एका साधारण कुटूंबात झाला होता. त्यांचे वडील रॉस पोलिस अधिकारी आणि आई लॉरेल स्कूल केटरिंग असिस्टंट होत्या. जसिंडा यांच्या काकी, मेरी अर्डर्न या राजकारणात होत्या. त्यांच्या प्रभावाखाली सतराव्या वर्षी जसिंडा लेबर पार्टीच्या सदस्य झाल्या. तिथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. २००८मध्ये त्या पहिल्यांदा न्यूझीलंडच्या संसद सदस्य झाल्या त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त २८ वर्षं.

Navratri
Navratri 2022 : महिषासुराच्या रुपात गांधींजींची प्रतिमा; हिंदू महासभेच्या दुर्गा पूजेवरून वाद

महिला किंवा मुलांचे हक्क असो किंवा रोजगार धोरण असो, जसिंडा यांनी नियमित काम केले आणि त्यामुळे त्या आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आहेत. जसिंडा पर्यावरणाप्रेमी आहे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी संसदेत 'शून्य कार्बन' कायदा मंजूर केलाय. या कायद्यानुसार २०५० पर्यंत न्यूझीलंड शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश बनायचं लक्ष्य आहे.

न्यूझीलंड खरं तर शांत देश. पण २०१९मध्ये धार्मिक मुलत्त्ववादावरुन ख्राइस्टचर्च येथील दोन मशिदींमध्ये गोळीबार झाला त्यात तब्बल ५१ जणांचा मृत्यू झाला. याप्रसंगी जसिंडा यांनी हाताळलेली परिस्थिती कौतुकास्पद होती.

Navratri
Shardiya Navratri Jalgaon : इंद्रदेवजी नगरात महिलांच्या पुढाकाराने दुर्गोत्सव

कोरोनाकाळातही त्यांनी सर्व परिस्थिती खुप शांतपणे आणि सलोख्याने हाताळली. एवढंच काय तर लोकांची दयनीय अवस्था पाहून पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी कोरोना काळात आपले लग्न रद्द केले होते. अद्यापही त्या अविवाहीत आहे. जेसिंडा यांचा प्रियकर फिशिंग-शो होस्ट क्लार्क गेफोर्डशी त्या लग्नबंधनात अडकणार आहे. जेसिंडा यांना क्लार्क गेफोर्डपासून एक मुलगी पण आहे.

जसिंडा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या त्या काळातच मुलगी नीवचा जन्म झाला. जसिंडा यांनी प्रसूतीसाठी फक्त सहा आठवड्यांची सुटी घेतली होती पण क्लार्क यांनी बाळाला सांभाळत जेसिंडाला पुरेपुर साथ दिला. .

एक उत्तम पार्टनर, आई, पक्षप्रमुख, अन् पंतप्रधान अशा अष्टपैलू भूमिका निभावणाऱ्या जसिंडा या जगासाठी आणि प्रत्येक स्त्रिसाठी एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचा आदर्श हा प्रत्येकाने घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com