Navratri Festival 2019 : तेजस्विनी दिसली 'कोल्हापूरच्या अंबाबाई'च्या रुपात!

टीम ई-सकाळ
Sunday, 29 September 2019

सामान्य गृहिणींपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सगळ्याच महिलांसाठी खूप विशेष आणि जिव्हाळ्याचा उत्सव जर कोणता असेल, तर तो म्हणजे नवरात्रोत्सव!

राज्यासह देशभरात आजपासून नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरवात झाली. गावांपासून शहरांपर्यंत सगळीकडेच सार्वजनिक मंडळांनीही यंदा जोरदार तयारी केलेली दिसून आली. 

सामान्य गृहिणींपासून ते सेलेब्रिटींपर्यंत सगळ्याच महिलांसाठी खूप विशेष आणि जिव्हाळ्याचा उत्सव जर कोणता असेल, तर तो म्हणजे नवरात्रोत्सव! सोशल मीडियावरही अनेकांनी एकमेकांना नवरात्रीचा शुभेच्छा दिल्या आहेत. 

मराठी चित्रपट विश्वातील तारका आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देताना तिने 'कोल्हापूरची अंबाबाई'च्या रुपातील स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. 

ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला. त्याला अनुसरूनच तेजस्विनीने फोटोला कॅप्शन दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

प्रतिपदा "कोल्हापूरची आंबाबाई " . . याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी...माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी... पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्या टप्प्याने छाटलेस तू... कधी मोठया रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू...म्हणून सावरू शकले नाही तुला... पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार... मी बहरायचं नाही सोडणार मी बहरायचं नाही सोडणार . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

“याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी…माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी…

पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्या टप्प्याने छाटलेस तू… कधी मोठया रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू…म्हणून सावरू शकले नाही तुला…

पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार…
मी बहारायचं नाही सोडणार
मी बहारायचं नाही सोडणार”

अशी विदारक परिस्थिती मांडणारं कॅप्शन तिने दिलं आहे. गेल्या वर्षीही तिने देवीची नऊ रुपे सोशल मीडियावर अपलोड केली होती. यंदाही तिने पहिल्याच दिवशी हा एक फोटो अपलोड करून सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. याबद्दल तिच्यावर सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षावही होत आहे.

त्यामुळे आगामी दिवसांत देवीच्या विविध रुपातील तिचे आणखी फोटो पुन्हा एकदा बघायला मिळतील का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.  

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- करवीर निवासिनी अंबाबाईची त्रिपुरसुंदरी रूपात सालंकृत पूजा

- Navratri Festival 2019 : आई राजा उदो-उदोच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना

- Navratri Festival 2019 : रॉकेट वूमन!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejaswini Pandit has shared a photo on social media on the occasion of Navratri festival