जागर स्त्री आरोग्याचा; त्वचा, केसांकडे दुर्लक्ष नकोच

बदलत्या जीवनशैलीचा, वातावरणाचा त्यावर गंभीर परिणाम दिसतो आहे.
Navratra
Navratra Sakal

महिलांसाठी त्वचा आणि केस हे प्राणप्रिय. बदलत्या जीवनशैलीचा, वातावरणाचा त्यावर गंभीर परिणाम दिसतो आहे. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर समस्या गंभीरही होऊ शकते. या महत्वाच्या विषयावर संवाद साधताहेत त्वचारोग डॉ. सपना तिप्पाणावर

लॉकडाउनमुळे बरेचजण घरच्या घरी काम करत आहेत. त्वचेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा त्यांचा गैरसमज आहे. घरी असला तरीही सनक्रीम लावलेच पाहिजे. घरातील स्वयंपाक खोलीतील कामांमुळेही त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचेची योग्य निगा, डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार वेळीच होणे गरजेचे आहे.

सणासुदींचा महिना सुरू आहे. स्वयंपाक घरात महिलांना अधिक काम असते. या कालावधीत त्वचेची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. भाजणी किंवा गरम तेल अंगावर उडाल्यास तत्काळ डॉक्टारांना दाखवा. वेळीच उपचार करा. त्वचेवर व्रण राहणार नाहीत. नोव्हेंबर, डिसेंबर थंडीचा महिना. या काळात त्वचेच्या अनेक समस्या दिसतात. कोल्डक्रीमचा वापर करा. ती संपूर्ण शरिरास लावा. त्वचा मऊ, मुलायम, तेजस्वीही होते. साबण ग्लीसरिनयुक्त, मिल्कबेस असावा. सौम्य, सुगंधमुक्त बॉडी क्लिन्झर्सचा वापर करावा. आंघोळीनंतर त्वचा अलगतपणे टिपा. ओलसर त्वचेवर मॉश्‍चराईझर लावल्यास त्वचेचा कोरडेपणा, भेगा टळतील.

सारे व्यस्त आहेत. चिंता, वाढता ताणतणाव, झोपेचे बदलेल्या वेळा, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यामुळे मुरमाचे प्रमाण, पिंगमेंटेशनचे प्रमाण वाढताना दिसते आहे. यात महिलांची संख्या अधिक आहे. यासाठीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार पद्धतीने होणे आवश्‍यक आहे. चुकीच्या घरगुती उपायांमुळे हायपर पिंगमेंटेशनची समस्या होवू शकते. त्यासाठी अत्याधुनिक लेसर, केमिकल फिलींगचे पर्याय आहेत. यामुळे त्वचा उजळून येते. चेहऱ्याचा काळपटपणा कमी होतो. मोड्या कमी होण्यास मदत होते. कोणतेही क्रीम, फेसवॉश लावण्यापुर्वी योग्य तो सल्ला घ्या.

Navratra
अनिल देशमुख बेपत्ता होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे का ? - प्रसाद लाड

त्वचेच्या फंगल इन्फेक्शनच्या समस्या अनेकांना जाणवत आहेत. त्याठिकाणी इन्फेक्शन झाले आहे. ती जागा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. तसेच खाज आणि लालपणा कमी झाल्यानंतर क्रीम लगेच बंद करून नये. एकमेकांचे टॉवेल, साबण, उशी, अंथरूणे वापरू नका. आतले कपडे, सॉक्स आणि कपडे रोजच्या रोज बदलले पाहिजे. सैल, कोरडे, सुती कपड्यांचा वापर करावा.

केसांच्या समस्या

कामाचा ताण, व्यायामाचा अभाव यामुळे केसांच्या समस्यांच्या वाढल्या आहेत. योग्य आहार, विहार गरजेचा आहे. केस वाढविणे अथवा अनावश्‍यक केस कमी करण्यासाठी सध्या अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध झाल्या आहेत. त्यात लेसर तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात येतो. यामुळे त्वचेला कोणताही धोका निर्माण होवू शकत नाही.

Navratra
अल्पवयीन मुलीसोबत संमतीने शरीरसंबंध ठेवणे बलात्कारच - HC

मानसिक तणाव टाळा

मानसिक तणावाचा त्वचेवर परिणाम होतो. नोकरी, व्यवसाय, घरगुती प्रश्‍न सगळ्यांनाच आहेत. अतितणावामुळे शरिरात रासायनिक द्रव्ये तयार होतात. त्याचा परिणाम त्वचेवर होतो. पिगमेंटेशन डिसऑर्डर, मुरूमे, त्वचा निस्तेज होणे, सुरकुत्या पडणे अशा समस्या जाणवतात. त्वचा खुलविण्यासाठी मानसिक स्वास्थ्यही गरजेचे आहे.

- डॉ. सपना तिप्पाणावर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com