Beed
बीड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हाही आहे. बीड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय बीड शहर हे आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या जवळजवळ मध्यभागी असून तो महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागात मोडतो. बीड हा महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा सहकारी चळवळींसाठीही ओळखला जातो. महाराष्ट्र राज्यातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडीसाठी बहुधा बीडचा कामगार असतो. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला जिल्ह्याचा काही भाग दुर्गम अणि डोंगराळ आहे. बीडची दुष्काळी भाग म्हणूनही ओळख आहे. बीड हा तुलनेने मागासलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात मराठी व्यतिरिक्त हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात.