चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १० जून १९५९ रोजी झाला. ते महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री आहेत. कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांचे ते पालकमंत्रीही आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. विद्यार्थी परिषदेतील संघटनात्मक बांधणीचे त्यांच्यातील गुणवैशिष्ट्य हेरून भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांनी त्यांना पक्षाचे काम सुरु करण्यास सांगितले. त्यानुसार, राजकीय जीवनात प्रवेश करुन त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. सन २००४ मध्ये त्यांनी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली. सन २००९ मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली. या निवडणुकीत शरद पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करुन विधान परिषदेत प्रवेश केला. २०१३ रोजी त्यांची पक्षाच्या प्रदेशउपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर २०१४ मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय संपादन करत, विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत, सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम आदी विभागाची सूत्रे सोपवण्यात आली.

विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब...
विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले. त्यानंतर विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांचा धडाका लावला. या प्रचारसभांमधून नेतेमंडळी एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत....
Vidhan sabha 2019 : पुणे : शहरातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी आमदारांची भाजपमध्ये मेगाभरती सुरू असताना आज शिवसेनेलाही भाजपने खिंडार पाडले....
कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या पक्षाचे  आज (मंगळवार) भाजपमध्ये विलीन झाला असून, या दिवसाची वाट पाहात होतो असे...
मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकामागून एक धक्के बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज (मंगळवार) आणखी एक धक्का बसला असून, विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांनी आज...
विधानसभा 2019 पुणे कॅन्टोन्मेंट : महायुतीच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे, कारण एकीतच यश आहे. आपण वेगवेगळ्या दिशेने चाललो तर...
बरेली (उत्तर प्रदेश) : 'देव तारी त्याला कोण मारी...' या म्हणीचा प्रत्यय येथे...
नांदेड: कोब्रा जातीच्या सापाने एका युवकाला दंश केला. युवकाने तत्काळ त्या सापाचा...
पुणे : 'दृश्यम' सिनेमाप्रमाणे कुठलाही पुरावा न ठेवता केलेला खून अखेर...
नवी दिल्ली : अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय वंशाच्या अभिजित...
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी...
मुंबई : रिंकू राजगुरु ही घराघरात पोहोचली ती 'सैराट' या चित्रपटामुळे. अख्ख्या...
पुणे: खडकवासला धरणातून सुरू होणाऱ्या मुठा कालव्याची सिंमाभिंत पडुन सहा वर्षेचा...
पुणे: विमाननगर नेको गार्डन समोरील पदपथावर झाडाची तुटलेली फांदी बऱ्याच...
पुणे: राहुल नगर समोरील कॉलनी, अनुपम पार्क आणि हर्षद सोसायटीमध्ये दोन झाडे...
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह वैभववाडीचे पंचायत...
रायगड : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मतदान केले. त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी...
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील सामन्यांना नेहमीच गर्दी होते. या...