Childrens Day
२० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. मात्र, भारतात १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. १९५९ सालापर्यंत बालदिन ऑक्टोबर महिन्यात असायचा. १९५४ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पहिल्यांदाच बालदिन साजरा झाला. लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच बालदिन साजरा करण्यामुळे जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी असाही हेतू यामागे होता. परंतु, भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू होते . बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.