Congress
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील एक प्रमुख आणि दिर्घकाळ सत्तेत राहिलेला राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजाच्या काळी झाली. एलेन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी या पक्षाची स्थापन केली होती. राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचन्द्र बॅनर्जी हे होते. राहुल गांधी, सोनिया गांधी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, पी. व्ही. नरसिंहराव, मनमोहनसिंग, प्रणव मुखर्जी असे काही काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होत. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात सत्तेत आले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाला चमक दाखवता आली नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला 52 जागांवर विजय मिळाला असून या पक्षाच्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी या आहेत. तर, हाताचा पंजा हे या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.