Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री व भाजपचे नेते आहेत. शरद पवारांनंतर सर्वात तरूण मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखले जाते. तसेच, मुख्यमंत्री पदाची संपूर्ण टर्म पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री होत. यापूर्वी केवळ वसंतराव नाईक यांनी आपली संपूर्ण टर्म पूर्ण केली आहे. 31 ऑक्टोबर 2014मध्ये त्यांनी वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विद्वत्ता, लोकप्रियता व स्वच्छ प्रतिमेमुळे फडणवीस महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत. जनसंघाचे संस्कार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त लहानपणापासून लागल्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्दही उत्तम सुरू आहे. नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतले व ते राजकारणाकडे वळले. भारतीय जनता युवा मोर्चाचे काम केल्यानंतर 1999 ते 2014 पर्यंत त्यांनी आमदारकी गाजवली. तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले आहे.