कोरोनापासून नागरिकांच्या बचावासाठी नवी मुंबई महापालिकेने उचललं 'हे' मोठं पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

नवी मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावाला वेळीच रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने शिघ्रकृती दलाची स्थापना केली आहे. महापालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक रुग्णालय-वाशी, डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय व माता बाल रुग्णालय-बेलापुर येथे विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. तसेच नागरीकांना गरज पडल्यास प्रवास करणे, मॉल्स, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, ए.पी.एम.सी. मार्केट या ठिकाणी स्वच्छता राहिल याबाबत दक्षता घेणेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

घृणास्पद ! आपल्या मित्रांना 'त्याने' दिली होती पत्नीचं शरीरसुख घेण्याची परवानगी...

कोरोनाचा राज्यभरात वाढता फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याधर्तीवर गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करोना व्हायरस संसर्गाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पालिकेने करोना व्हायरस संसर्ग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. नागरिकांनी गरज असेल तरच प्रवास करावा, तसेच बाहेरगावी जाणारा प्रवास शक्‍यतो टाळणेबाबत सूचना जारी केल्या आहेत. शहरातील वेगवेगळया टुर्स ट्रॅव्हल्स एजन्सींनी पर्यटनसाठी परदेशात जाण्याऱ्या सर्व सहली रद्द कराव्यात अशा सुचना देण्यात आल्या आहेत. पालिका क्षेत्रातुन सद्यास्थितीत किती नागरिक पर्यटन, इतर कारणाकरिता बाहेरगावी गेले याची माहिती घेण्यात येत आहे. सदरचे नागरीक त्यांच्या वास्तव्याच ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यामध्ये लक्षणे आढळुन आल्यानंतर त्यांची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मॉल्स, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक शौचालये, सार्वजनिक ठिकाणे, गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, ए.पी.एम.सी. मार्केट या ठिकाणी स्वच्छता राहिल याबाबत दक्षता घेणेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

भीषण ! परदेशात वापरलेले N95 मास्क धुवून विक्रीसाठी आणलेत भिवंडीच्या गोदामात

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक रुग्णालय-वाशी, डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय व माता बाल रुग्णालय-बेलापुर येथे विलगीकरण कक्ष स्थापन केले आहेत. शहरातील खाजगी वैदयकीय व्यवसायिकांना स्वंयसेवा तत्वावर रुग्णालयीन सेवा पुरविणेबाबत आवाहन केले आहे. भविष्यात आवश्‍यकता भासल्यास रुग्ण खाटा संख्येत वाढ करण्याबाबत आवश्‍यक ती काळजी घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

navi mumbai municipal corporation formed rapid action force to avoid corona in city

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navi mumbai municipal corporation formed rapid action force to avoid corona in city