Mulayam Singh Yadav
समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायमसिंह यादव. मुलायमसिंह यादव यांचे उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठे नाव आहे. त्यांनी 5 डिसेंबर 1989 ते 24 जून 1991 या कालावधीत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. नारायण दत्त तिवारी यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर 1 जून 1996 त 19 मार्च 1998 या कालावधीत भारताचे संरक्षणपदही त्यांनी भूषविले. तसेत 29 ऑगस्ट 2003 ते 13 मे 2007 या कालावधीत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मध्यंतरीच्या काळात त्यांचे पुत्र आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यामध्ये पक्ष नेतृत्त्वावरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला होता, की न्यायालयात जाण्यापर्यंत ही घडामोड झाली होती.