Nashik
नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील प्रमुख शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात उत्तर महाराष्ट्राचे, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी लेणी ही बौध्द लेणी आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठही नाशिकमध्येच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी ॲन्ड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले शहर आहे. पंचवटी हा नाशिकचा एक भाग आहे. नाशिक मधील अशी धार्मिक स्थळं पाहिल्याबरोबर आपल्याला पुरातन काळाचे महत्व कळते.