सोलापूर : हैदराबाद-पुणे शिवशाही बसमध्ये (एमएच - 14, जीडी - 9614) उमरगा येथून प्रवास करणारा प्रवासी बलात्काराच्या आरोपातील गुन्हेगार असल्याचे सांगून, बोरामणी...

उस्मानाबाद जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. हैदराबादच्या 7 वा निजाम मीर उस्मान अली खानच्या सन्मानार्थ उस्मानाबादचे नाव देण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १४,८६,५८६ (२००१च्या जनगणेनुसार) इतकी असून त्यातील १५.६९ % शहरी आहे. जिल्ह्यातील 'तुळजापूर' येथील 'तुळजाभवानी' मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच, तुळजाभवानी माता ही शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे.