Prithviraj Chavan
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नाव म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पंतप्रधान कार्यालयातही राज्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला होता. 2010 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आदर्श इमारत गैरव्यवहार प्रकरणात समोर आले होते. त्यादरम्यान अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे आले होते. महाराष्ट्राचे 17 वे मुख्यमंत्री म्हणूनही पृथ्वीराज चव्हाण यांनी काम पाहिले. पृथ्वीराज चव्हाण हे पारदर्शी कारभारासाठी ओळखले जातात.