Ram Kadam
राम कदम हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते आहेत. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९७२ रोजी झाला आहे. ते मुंबईतील घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राम कदम हे पूर्वाश्रमीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. मनसेने मराठीची भूमिका घेत मराठीतून शपथ घ्यावी याचा आग्रह करीत आमदार अबू आझमी यांना त्यांनी विरोध केला होता, म्हणून त्यांचे निलंबन करण्यात आले होते. ८ नोव्हेंबर २००९ रोजी राम कदम यांनी अबू आझमी शपथ घेण्यासाठी पुढे गेलेले असतानाच त्यांना चोप देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळेच राम कदम यांचे सुरवातीलाच तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र एक वर्षात त्यांच्यावरील हे निलंबन मागे घेण्यात आले होते. नंतर केलेल्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळेही ते चांगलेच चर्चेत आले होते.