
सातारा हे शहर महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागात हा जिल्हा आहे. उत्तरेस निरेच्या प्रवाहाने पुणे आणि सातारा जिल्ह्याची सीमा ठरते. पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांगा आहेत जे रत्नागिरी व सातारच्या सीमेवर आहेत. दक्षिणेस सांगली जिल्हा व पूर्वेला सोलापूर जिल्हा आहे. सातारी कंदी पेढे, सुपनेकर वडा, मॅप्रोची उत्पादने याशिवाय असंख्य पदार्थ येथे मिळतात. तसेच साताऱ्यातील खाद्यपदार्थामध्ये चिरोटे हा एक पदार्थ प्रसिध्द आहे. मराठ्यांच्या काळात सातारा ही राज्याची राजधानी होती. महाबळेश्वर, ठोसेघर, कासपठार ही जिल्ह्यातील काही प्रेक्षणीय स्थळे आहेत.