
डॉ. सुब्रमण्यम स्वामी हे भारतीय राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते खासदार आहेत. याशिवाय प्रभावी गणितज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. स्वामी 24 वर्षाचे असतानाच त्यांनी हार्वर्ड विश्वविद्यालयातून पीएचडी डिग्री मिळवली. 27 वर्षाचे असताना त्यांनी हार्वर्डमध्ये गणित विषय शिकवला. एका गैर राजकीय सर्वोद्य आंदोलनातून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरवात झाली. डॉ. स्वामी यांची उदारवादी आर्थिक धोरणे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मान्य नव्हती. इंदिरा गांधींमुळे स्वामींना आईआईटीतून काढता पाय घ्यावा लागला. यावरुन त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला, ज्यात कोर्टाचा निकाल त्यांच्याकडून लागला. यानंतर डॉ. स्वामी यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधी पक्ष जनसंघकडून निवडणूक लढवित ते राज्यसभा सदस्य बनले. 2004 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी आपल्या पक्षाचे जेवढे उमेदवार उतरविले त्यापैकी कुणीही जिंकून आले नाही. आता ते भारतीय जनता पक्षात कार्यरत असून विद्यमान खासदार आहेत.