Sushil Kumar Shinde
सुशीलकुमार संभाजीराव शिंदे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९४१ रोजी झाला आहे. ते मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचे रहिवाशी आहेत. १६ जानेवारी २००३ ते १ नोव्हेंबर २००४ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. २००४ ते २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही होते. मनमोहनसिंग सरकारमध्ये गृह खात्याचे कॅबिनेट मंत्रीही ते राहिले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे पहिले मराठी नेता होते. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत मात्र सलग दोनवेळा त्यांचा पराभव झाला आहे.