चला, फूड फेस्टिव्हलला...! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर- "सकाळ'ने आयोजित केलेल्या कोल्हापूर फूड फेस्टिव्हलची उत्सुकता आता संपली असून, शुक्रवार (ता.17) पासून फेस्टिव्हलला प्रारंभ होणार आहे. 

कोल्हापूर- "सकाळ'ने आयोजित केलेल्या कोल्हापूर फूड फेस्टिव्हलची उत्सुकता आता संपली असून, शुक्रवार (ता.17) पासून फेस्टिव्हलला प्रारंभ होणार आहे. 
सासने मैदानाजवळील महाराणी लॉन (किरण बंगल्याशेजारी) येथे सलग चार दिवस हा खाद्ययात्रा महोत्सव रंगणार असून, फूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध हिरा ग्रुप ऑफ कंपनीज्‌ महोत्सवाचे मुख्य प्रायोजक, तर यश बेकर्स- रावसाहेब वंदुरे ग्रुप सहप्रायोजक आहेत. न्यू गणेश कॅंटिन सर्व्हिसेस कॅंटिन पार्टनर आहे. सोलाईफ न्यूट्रिशन्स व सोया प्रॉडक्‍टस्‌ एनर्जी ड्रिंक पार्टनर आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.17) सकाळी साडेअकरा वाजता महापौर हसीना फरास यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होईल. 

कोल्हापुरी मटण, पांढरा-तांबडा रस्सा, झुणका-भाकर, दही-खर्डा-भाकरीपासून ते तरुणाईला भुरळ घालणारी सर्व प्रकारची खाद्यसंस्कृती येथे अवतरणार आहे. त्याशिवाय 
विविध जॅम-सूपपासून बिस्कीट, विविध सरबते, लोणची-पापड, मसाले, पॅकिंग राईस, फिश, खाद्यतेल, नमकिन्स, फिंगर चिप्स आणि मुखवासापर्यंतची फूड प्रॉडक्‍टस्‌ही महोत्सवात उपलब्ध असतील. महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, खवय्यांबरोबरच आपले प्रॉडक्‍ट अधिकाधिक कोल्हापूरकरांपर्यंत पोचवण्यासाठी विविध फूड कंपन्यांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे. चला, तर मग फूड फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ या. आवडत्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारू या...! 

- हिरा ग्रुपविषयी... 
हिरा ग्रुप ऑफ कंपनीज्‌ एफएमसीजी क्षेत्रातील एक नामांकित नाव आहे. हिरा रोलर आणि फ्लोअर मिल, पानमसाला, शिक्षण तसेच कन्स्ट्रक्‍शन क्षेत्रात जगभरातही या कंपनीची ख्याती आहे. विविध क्षेत्रांत विस्तारताना कंपनीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

- यश बेकर्सविषयी... 
बेकरी प्रॉडक्‍टस्‌ क्षेत्रातील पश्‍चिम महाराष्ट्रातील आयएसओ मानांकित ही कंपनी असून खारी, नानकटाई, कोकोनट बिस्किटस्‌, व्हेजिटेरियन केक, नॉन व्हेजिटेरियन केक, रस्क टोस्ट, कोकोनट कुकीज्‌ आदी प्रॉडक्‍टस्‌ना मोठी मागणी आहे. "इट यश- गेट यश' हे कंपनीचे ब्रीद आहे. 

- सोलाईफविषयी... 
चेप्रिओ फूडस्‌ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सोयाबीनपासून प्रक्रियायुक्त "सोलाईफ' सोयामिल्क प्रॉडक्‍टस्‌ हे भारतीय आहार पद्धतीचा अविभाज्य भाग बनावा, या उद्देशाने उत्पादित केली आहेत. सोया फ्लेवर दूध, पनीर, नमकीन, शेव व बुंदी आदी उत्पादनांना मोठी मागणी आहे. 

Web Title: food festival kolhapur