जत मनरेगा घोटाळ्याबद्दल 12 जणांवर फौजदारी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

सांगली - जत तालुक्‍यातील एकुंडी, कासलिंगवाडीतील मनरेगांतर्गत 36.74 लाख अपहार प्रकरणी तत्कालीन बीडीओ ओमराज गहाणे, प्रभारी बीडीओ ज्ञानदेव मडके, कनिष्ठ लेखाधिकारी प्रवीण माने यांच्यासह 12 जणांवर फौजदारी आणि संबंधितांकडून रक्कम वसुली केली जाईल. बाज मधील 45.32 लाखांच्या अनियमिततेप्रकणी सहा अधिकारी, सरपंच यांना नोटीस दिल्या जाणार आहेत. त्यांची विभागीय चौकशी आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज पत्रकारांना दिली. तिन्ही चौकशी प्रकरणांचा अहवाल विभागीय आयुक्तांना देण्यात येणार आहे. 

जतमधील मनरेगांतर्गत घोटाळ्याच्या तक्रारीवरून सीईओ भोसलेंनी 30 जानेवारीला चौकशी समिती नेमली होती. ग्रामविकासचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने अध्यक्ष होते. समितीने 2500 पानांचा अहवाल बुधवारी प्रशासनाकडे दिला. त्यावर काही अधिकाऱ्यांच्या सह्या नव्हत्या. परिपूर्ण अहवाल आज सीईओंना मिळाला. 

याप्रकरणी तत्कालीन बीडीओ गहाणे, मडके, कनिष्ठ लेखाधिकारी माने, पाच डाटा ऑपरेटर, कृषी अधिकारी कैलासकुमार मारकाम, ग्रामरोजगार सेवक देवांग, ग्रामसेवक सरक, तत्कालीन सरपंच एन. डी. बजबळे यांच्यावर फौजदारीचे आदेश दिले. उपमुख्यकार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ पोलिसांत फौजदारी करतील. 

तपासातील निकर्ष असे- एकुंडीतील कामांचा वार्षिक आराखड्यात समावेश न करता काम घेतले. प्रशासकीय मंजुरी नव्हती. ऑनलाइन कोड काढण्यात आले. 275 मजुरांना रक्कम देण्यात आली आहे. 24.19 लाख रक्कम तत्कालीन बीडीओ, सहायक बीडीओ, पाच डाटा ऑपरेटर, कनिष्ठ लेखाधिकारी माने यांच्याकडून वसुली होईल. 

कासलिंगवाडीतील चार मातीनालाबांध दुरुस्तीऐवजी बीडीओंनी जुन्या कामांची तोडफोड करून नवीन काम दाखवले. या प्रकरणी सात जण दोषी आहेत. त्यात गहाणे, मडके, मारकाम, ग्रामरोजगार सेवक देवांग, सरपंच बजबळे, माने यांचा समावेश आहे. 

बाज येथे सिमेंट-नाला बांधकाम नियमानुसार न करता ठेकेदारामार्फत करण्यात आले. 45.32 लाखांची अनियमितता आहे. या प्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, उपअभियंता छोपावी यांच्यासह प्रमुख 6 अधिकारी दोषी आहेत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी अन्‌ प्रशासकीय कारवाई सुचवली आहे. 

Web Title: 12 cases of criminal