ट्रम्प यांच्या व्हिसाबंदी निर्णयावरील सुनावणी स्थगित

वृत्तसंस्था
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुढील घडामोडींपर्यंत ही सुनावणीची प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे या न्यायालयाने म्हटले आहे. 

सॅन फ्रँसिस्को- अमेरिकेच्या अपीलीय न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिसा बंदीच्या निर्णयावरील सुनावणी सध्या स्थगित केली आहे. 

मुस्लिम बहुसंख्य असणाऱ्या सात देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्याच्या वादग्रस्त निर्णयावरून गदारोळ झाल्यानंतर आता व्हिसाबाबत नवा निर्णय लवकरच घेण्यात येईल असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. 
 
ट्रम्प यांच्या आदेशाला दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीचा निर्णय पुनर्विचारात घ्यावा यावर येथील अपीलांसाठीच्या नवव्या अमेरिकन सर्किट कोर्टाचा विचार सुरू आहे. पुढील घडामोडींपर्यंत ही सुनावणीची प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे या न्यायालयाने म्हटले आहे. 

Web Title: Appeals court suspends proceedings over Trump travel ban