स्पृहा आणि गश्‍मीरची हटके जोडी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई : "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं,' असे म्हणत आणखी एक फ्रेश जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ही जोडी आहे स्पृहा जोशी आणि गश्‍मीर महाजनी... किडा प्रॉडक्‍शन्सच्या आगामी मराठी चित्रपटातून ही जोडी आपल्याला भेटणार आहे. अलीकडेच या सिनेमाचा मुहूर्त चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल यांच्या हस्ते झाला. या वेळी चित्रपटाचे सहनिर्माते रवी सिंह, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवले असल्याने या चित्रपटाचे नाव काय असेल, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्धांस यांच्याकडे आहे. या चित्रपटातील नवीन जोडीबद्दल ते म्हणाले की, या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. स्पृहा माझी खूप छान मैत्रीण आहे; पण याआधी तिच्यासोबत काम करण्याचा योग आला नव्हता. हा योग या चित्रपटाच्या माध्यमातून आला आहे. गश्‍मीर आणि स्पृहादेखील या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. दोघांमध्ये चांगली केमिस्ट्री होऊन त्यांचे काम अनुभवणे प्रेक्षकांसाठी एक चांगला अनुभव ठरेल,' असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 
या चित्रपटाची निर्मिती पी. एस. छतवाल आणि रिचा सिन्हा यांनी केली असून, सहनिर्माते रवी सिंह आहेत. नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटासाठी सौरभ, हृषिकेश दातार आणि जसराज जोशी यांचे संगीत असणार आहे, तर छायाचित्र दिग्दर्शन प्रसाद भेंडे करणार आहेत. 

Web Title: spruha joshi and gashmir mahajani