क्ष किरणांचे ध्रुवीकरण टिपण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे - अंतराळातील न्यूट्रॉन्स ताऱ्यावरून उत्सर्जित होणाऱ्या क्ष किरणांचे (एक्‍स रे) ध्रुवीकरण टिपण्यात देशातील संशोधकांना यश आले आहे. यासंबंधी आधीच्या सिद्धांतांना छेद देणारे निष्कर्ष भारतीय संशोधकांनी टिपले आहेत.

पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलभौतिक आणि खगोलशास्र संस्था (आयुका), ‘मुंबई आयआयटी’, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’, अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी या संस्थांनी संशोधनात योगदान दिले आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना यासंबंधी अधिक सिद्धांत मांडता यावेत म्हणून हे संशोधन ‘नेचर ॲस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात आज प्रकाशित करण्यात आले आहे. 

‘आयआयटी मुंबई’चे शास्त्रज्ञ डॉ. वरुण भालेराव म्हणाले, ‘‘न्यूट्रॉन तारे हे प्रचंड वेगात फिरत असतात. सेकंदात तीस वेळा ते फिरतात. त्या वेळी त्याच्या वेगवेगळ्या बाजू दिसतात. त्यावरून क्ष किरणांचे जे उत्सर्जन होते, त्याचे ध्रुवीकरण (पोलरायझेशन) मोजण्यात यश आले. याबाबत आधी वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले. त्यात ध्रुवीकरणाची रचना सांगण्यात आली होती. परंतु नवे संशोधन या सिद्धांतांना छेद देणारे आहे. ‘ॲस्ट्रोसॅट’वरील ‘सीझेडटीआय’ या दुर्बिणीद्वारे हे ध्रुवीकरण मोजण्यात आले आहे. ॲस्ट्रोसॅट प्रक्षेपित केल्यानंतर हे संशोधन सुरू झाले. सुमारे दीड वर्ष त्यावर काम केल्यानंतर हे यश मिळाले.’’

‘ॲस्ट्रोसॅट’ हा पूर्णतः भारतीय बनावटीचा उपग्रह आहे. त्याचे सर्व संशोधन हे भारतीय शास्त्रज्ञांनी केले आहे. याद्वारे अनेक स्रोतांचा अभ्यास करण्यात येत आहे. यातून होणारे संशोधन या पुढील काळातही भारतीयांसमोर येत राहील,’’ असा विश्‍वास डॉ. भालेराव यांनी व्यक्त केला.

Web Title: pune news Success of polarization of X-rays