राहुल गांधींशी फोनवर चर्चा; भेटही घेणार - नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नागपूर - कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा फोन आला. त्यांच्याशी चर्चा केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांची भेटही घेणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सर्वच नेत्यांची भेट घेत असल्याचे नमूद करीत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी 1 डिसेंबरला अकोला येथे शेतकरी परिषद होणार असल्याची माहितीही दिली. या परिषदेत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अकोल्यात 1 डिसेंबर रोजी कापूस, सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांची परिषद होणार आहे. या परिषदेला माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह विदर्भातील शेतकरी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे हे प्रश्‍न मांडण्यासाठी परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

वापरा अन्‌ फेका, भाजपची नीती 
भाजपची नीती "युज अँड थ्रो' अशी आहे. भाजप नेत्यांचा वापर करून घेते व फेकून देते, असा आरोप करीत ते म्हणाले, ज्या पक्षाला लालकृष्ण अडवानी यांनी वाढविले, त्यांनाच त्यापक्षाने आता अडगळीत टाकले. भाजपमध्ये अनेक असंतुष्ट नेते आहेत. वेळ आल्यानंतर त्यांच्याशी उघडपणे चर्चा करू, असेही ते म्हणाले. 

नोटाबंदीच्या काळातील बळींना हुतात्मा घोषित करावे 
नोटाबंदी झाल्यानंतर बॅंकांच्या रांगांमध्ये उभे राहणाऱ्या 300 लोकांचा मृत्यू झाला, त्यांना हुतात्मा घोषित करावे, किती बनावट नोटा बाहेर आल्या व काळा पैसा बाहेर आला, अशी मागणी त्यांनी केली. या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे हे सरकार अप्रामाणिक आहे, असा टोला त्यांनी मारला. 

Web Title: nagpur news rahul gandhi nana patole