गुंतवणूकदारांच्या खरेदीने सेन्सेक्‍स स्थिरावला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

मुंबई - जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने गुरुवारी (ता. ९) सेन्सेक्‍सने तेजीची वाट धरली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३२.१२ अंशांच्या वाढीसह ३३,२५०.९३ अंशांवर स्थिरावला. निफ्टीही ५.८० अंशांची वाढ होऊन तो १०, ३०८.९५ अंशांवर बंद झाला. 

केंद्र सरकारने आणखी काही जीवनावश्‍यक वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आज बाजारात एफएमसीजी, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये खरेदी दिसून आली. त्याशिवाय औद्योगिक उत्पादन आणि ग्राहकमूल्यावर आधारीत महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार आहे.

त्यामुळे गुंतवणूकदार सावधपणे खरेदी करत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य संशोधक विनोद नायर यांनी सांगितले. 

आजच्या तेजीत भारती एअरटेल, एशियन पेंट, टाटा मोटर्स आदी शेअर वधारले. आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एनटीपीसी, डॉ. रेड्डी लॅब आदी शेअरमध्ये वाढ झाली. आयटीसी, कोल इंडिया, ओएनजीसी, एचडीएफसी, ॲक्‍सिस बॅंक, हिरोमोटो कॉर्प आदी शेअर दबावात होते.

Web Title: arthavishwa news Sensex stabilized by buying investors