यंदा विवाहासाठी ५३ मुहूर्त

संदीप लांडगे
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - तुळशी विवाहानंतर वेध लागतात ते लग्नसराईचे. वयात आलेल्या मुला-मुलींचे विवाह उरकण्यासाठी घरोघरी पालकांची घाई सुरू होते. यंदा नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांत लग्नाचे ५३ मुहूर्त आहेत. यात सर्वाधिक नऊ मुहूर्त फेब्रुवारी व मे महिन्यात असून, जूनमध्ये सर्वांत कमी म्हणजे फक्त चारच मुहूर्त आहेत. जानेवारीत एकही नाही.   

मराठी महिन्यानुसार कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला सुरवात होते. त्यानंतर वयात आलेल्या मुला-मुलींचे लग्न उरकण्यासाठी पालक तारखा शोधण्याची मोहीम सुरू करतात. एकदा का तारीख ठरली की मंगल कार्यालयाचे बुकिंग, भोजनाची ऑर्डर, लग्नपत्रिका छपाई, कपडे, सोने खरेदी या कामांना वेग येतो. सध्या पुरोहितांकडे सोयीनुसार तारीख ठरविण्यासाठी नवरा-नवरीकडील पालकांची झुंबड उडालेली दिसत आहे. 

तुळसी विवाहानंतर कार्य सुरू होतात; परंतु कार्तिक महिन्यात शुक्रास्तामुळे मुहूर्त विवाहायोग्य मुहूर्त नाहीत, म्हणजे १९ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरवात होत आहे. २१ नोव्हेंबरच्या मुहूर्तावर शहरात लग्नाचा धूमधडाका सुरू होणार आहे.

यंदा २१ नोव्हेंबर ते १५ जुलै या नऊ महिन्यांत एकूण ५३ मुहूर्त लग्नासाठी योग्य आहेत. कार्तिक मासातील शुक्रास्त आल्यामुळे व अठरा मेपासून १३ जूनपर्यंत अधिक मास आल्यामुळे विवाह योग्य मुहूर्त नाहीत; परंतु याच ज्येष्ठ महिन्यात निजज्येष्ठात विवाह मुहूर्त आहेत. म्हणून विवाहयोग्य मुला-मुलींच्या पालकांनी काळजी करू नये.
- सुरेश केदारे पाथरीकर, गुरुजी, औरंगाबाद

अशा आहेत शुभ तारखा
नोव्हेंबर २०१७ ते जुलै २०१८ पर्यंतचे विवाह मुहूर्त
महिना- तारीख 

नोव्हेंबर - २१, २३, २५, २८, २९
डिसेंबर -३, ४, १०, ११, १२
जानेवारी- मुहूर्त नाहीत 
फेब्रुवारी- ५, ९, ११, १८, १९, २०, २१, २४, २५.
मार्च - ३, ४, ५, ६, १२, १३, १४.
एप्रिल- १९, २०, २४, २५, २६, २७, २८, ३०.
मे - १, २, ४, ६, ७, ८, ९, ११, १२.
जून- १८, २३, २८, २९
जुलै - १, २, ५, ६, ७, १०

Web Title: aurangabad marathwada news marriage muhurt