सोलर पॉवर प्लॅंटची मागणी राज्यात वाढली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद -  वारंवार होणारे भारनियमन आणि वाढणाऱ्या वीजबिलांमधून मुक्तीसाठी राज्यात सोलर पॉवर प्लॅंटची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील साडेतीनशे ग्राहकांनी सोलरच्या पॉवर प्लॅंटच्या माध्यमाने वीजबिलाच्या त्रासातून मुक्तता करून घेतली आहे. जिल्ह्यात चार मेगावॉट; तर राज्यात 35 मेगावॉट विजेची सोलरच्या माध्यमाने गरज भागविली जात आहे. 

एकट्या औरंगाबाद परिमंडळात वीजगळतीचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के आहे. वीजगळतीचे प्रमाण ज्या भागात आहे, तेथे महावितरणला वीज तुटवड्याच्या काळात भारनियमन करावे लागते. त्यामुळेच वाढत्या बिलांच्या आणि भारनियमनामधून मुक्ततेसाठी नागरिक आता सरळ सोलरचा पर्याय निवडत आहेत. शहरामध्ये वर्षभरात 340 घरगुती म्हणजे एलटी ग्राहकांनी सोलर पॉवर प्लॅंट बसविले; तर दहा औद्योगिक वापर अर्थात एचटी अशा एकूण साडेतीनशे ग्राहकांनी सोलरच्या पॉवर प्लॅंटला पसंती दिली आहे. सध्या 70 ते 95 रुपये एक किलोवॉट या दराने सोलर पॉवर प्लॅंट उपलब्ध आहेत. 

काय करावे लागते? 
साधारण सात किलोवॉट क्षमतेपर्यंतच्या सोलरसाठी महावितरणच्या सब डिव्हिजनल कार्यालयाकडून परवानगी मिळते. त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या सोलरसाठी महावितरणच्या परिमंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो. ज्या ग्राहकाचा मंजूर भार (लोड) जितका आहे, तितक्‍याच सोलर पॉवर प्लॅंटची परवानगी मिळते. त्यासाठी महावितरणकडे अर्ज करावा लागतो. परवानगी मिळाल्यावर, विद्युत निरीक्षकांची परवानगी, टेस्ट रिपोर्ट आणि संबंधित कागदपत्रांची गरज असते. बहुतांश कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सोलर एजन्सीच मदत करतात. 

सोलर पॉवर प्लॅंट बसविण्याचे प्रमाण वाढत आहे. आमच्या एजन्सीने औरंगाबाद जिल्ह्यासह नांदेड, परभणी, धुळे या शहरांत एकूण 65 सोलर पॉवर प्लॅंट बसवून दिले आहेत. सोलरसाठी शासकीय पातळीवर प्रोत्साहन वाढण्याची गरज आहे. 
- मोहन शिखरे (ग्रीन सेन्स, सोलार सिस्टीम एजन्सीधारक)

Web Title: aurangabad news Solar power plant demand has increased in the state