पुणे: पाच वर्षांचा मुलीच्या गुप्तांगवर दिले चटके

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सोनी सतीश शेट्टी उर्फ सोनी शेख (वय ३३, रा. गोंधळेनगर कमानीजवळ, हडपसर ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रजनीश कुमार केदार प्रसाद तिवारी (रा. गोंधळेनगर) यांनी फिर्याद दिलेली आहे.

हडपसर : पाच वर्षाची निराधार मुलगी घरात खेळत असताना मसाल्यात पाणी पडल्याच्या कारणावरून तिचा सांभाळ करणाऱ्या महिलेने मुलीच्या गुप्तांगावरती चटके देवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी निर्दयी महिलेविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतर्क शेजाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. 

सोनी सतीश शेट्टी उर्फ सोनी शेख (वय ३३, रा. गोंधळेनगर कमानीजवळ, हडपसर ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत रजनीश कुमार केदार प्रसाद तिवारी (रा. गोंधळेनगर) यांनी फिर्याद दिलेली आहे.

सोनी ही मूळची कोलकत्याची असून ती गोंधळेनगर येथे गेली काही वर्ष राहत आहे. तिच्या मैत्रिणीने गेल्या चार वर्षांपूर्वी तिच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी सोनीकडे ठेवले. त्यानंतर मुलीची आई बेपत्ता झाली. सोनी हि गेली चार वर्षे त्या मुलीचा सांभाळ करत आहे. काल ती घरात स्वयंपाक करीत असताना मुलगी खेळताना मसाल्यांमध्ये पाणी सांडण्याच्या कारणावरून तिने मुलीला चटके दिले व मारहाण केली. शुक्रवारी शेजारी राहणाऱ्या रजनीश कुमार यांच्या घरी मुलगी नेहमीप्रमाणे गेली. तेव्हा तिच्या अंगावरील जखमांचे व्रण त्यांना दिसले. त्यांनी याबाबत मुलीला विचारणा केली असता मी खेळत असताना माझ्यामुळे मसाल्यात पाणी पडले, यामुळे सोनी हिने चटके दिले व मारहाण केल्याचे मुलीने तिवारी यांना सांगितले. मुलीच्या अंगावरील जखमा पाहून तिवारी यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांबरोबर त्या मुलीला घेऊन हडपसर पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सोनी शेट्टी हिच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस उपनिरिक्षक सुप्रीया गावडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Pune news women harass girl