जिग्नेश मेवानींविरोधात तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

भीमा कोरेगावच्या संग्रामाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारवाड्यावर झालेल्या "एल्गार' परिषदेत त्यांनी भडकावू भाषण दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध डेक्‍कन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पुणे  : "शनिवारवाड्यावर रविवारी (ता. 31) आयोजित परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी वादग्रस्त वक्‍तव्य केल्यामुळेच भीमा कोरेगाव येथे दोन गटांमध्ये वाद झाला. या घटनेला मेवानी आणि जेएनयू छात्र संघटनेचे उमर खालिद हे जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा,' अशी तक्रार अक्षय बिक्‍कड आणि आनंद धोंड यांनी केली आहे. 

भीमा कोरेगावच्या संग्रामाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारवाड्यावर झालेल्या "एल्गार' परिषदेत त्यांनी भडकावू भाषण दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध डेक्‍कन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

दरम्यान, "अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, पुढील कार्यवाहीसाठी तो विश्रामबाग पोलिसांकडे पाठवला आहे,' असे डेक्‍कनचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले; मात्र "अशा स्वरूपाची तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही,' असे विश्रामबागचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Marathi news complaint filed against Jignesh Mevani in Pune