संभाजीराव भिडे यांचेवर खोडसाळपणाने गुन्हा - शिवप्रतिष्ठानचा दावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

सांगली - कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्दैवी प्रकारामध्ये शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचे नाव नाहक गोवले आहे. या प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच प्रकार घडण्यापूर्वी त्यात कणभरही लक्ष घातले नाही. कोठे सभा घेतली नाही, की आवाहन केले नाही. तरीही खोडसाळपणाने त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल करणाऱ्यांची आणि शहानिशा न करता तो दाखल करून घेणाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी पत्रकाद्वारे केली आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठानचे कार्य राज्यात जोमाने वाढत आहे. ते काही असंतुष्ट, देशविघातक शक्तींना बघवत नसल्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन जाणीवपूर्वक श्री. भिडे यांचे नाव यात गोवले आहे. कोरेगाव भीमा येथे दुर्दैवी प्रकार जेव्हा घडला तेव्हा श्री. भिडे माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे सांत्वनासाठी इस्लामपूर येथे गेले होते. त्यानंतर भोर येथे सभा झाली. या सर्वांचे भक्कम पुरावे आहेत. तरीही फिर्यादींनी श्री. भिडे यांनी जाळपोळ, दगडफेक केल्याची खोटी फिर्याद दिली आहे. या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कोणीतरी करत आहे. यापूर्वीही फुटकळ संघटनांनी त्यांना गुन्ह्यात अडकवण्याचे काम केले होते. त्यामुळे या प्रकरणातही खोलवर जाऊन चौकशी करावी, अशी शिवप्रतिष्ठानची मागणी आहे.

Web Title: Sangli News Shiva Pritishtan's claim on Bhide Guruji offence