फोक्‍सवॅगनचे विक्रमी उत्पादन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - आघाडीची मोटार उत्पादक फोक्‍सवॅगनने पुणे प्रकल्पात विक्रमी उत्पादन घेतले आहे. २०१७ मध्ये कंपनीने पुणे प्रकल्पात तब्बल दीड लाख मोटारींची निर्मिती केली आहे. फोक्‍सवॅगनचा पुणे उत्पादन प्रकल्प हा मोटारीचे सुटे भाग बसवण्यापासून संपूर्ण असेम्बलिंगपर्यंत सुविधा देणारा भारतातील जर्मन मोटार उत्पादकांपैकी एकमेव प्रकल्प आहे. 

फोक्‍सवॅगन समूहाकडून पुणे प्रकल्पात आतापर्यंत ५ हजार ७२० कोटींची (८२५ दशलक्ष युरो) गुंतवणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पात ८२ टक्के 
स्थानिकीकरण पातळी प्राप्त केली असून, मार्चपासून येथे तीन पाळींमध्ये उत्पादन सुरू आहे. फोक्‍सवॅगन पोलो, अमिओ, वेन्टो व स्कोडा रॅपिड या मोटारींची या प्रकल्पात निर्मिती केली जाते. मोटारींव्यतिरिक्‍त १.५ लीटर आणि २.० लीटर डिझेल इंजिनची निर्मिती केली जाते. देशांतर्गत बाजारपेठेसाठी येथे २०१७ मध्ये ५७ हजार मोटारींची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये फोक्‍सवॅगन व स्कोडा या मोटारींचा समावेश होता. फोक्‍सवॅगन पोलो व वेन्टो यांचा समावेश असलेल्या तब्बल ९३ हजार १०० मोटारी येथून निर्यात करण्यात आल्याची माहिती फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आंद्रेस ल्युरमन यांनी दिली.

Web Title: arthavishwa news fox wagon production increase