तिमाही निकालांच्या पार्श्‍वभूमीवर सेन्सेक्‍स स्थिर

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी शेअर बाजारातील व्यवहार स्थिर राहिले. सुरवात तेजीने करणारा सेन्सेक्‍स दिवसअखेर केवळ ०.४९ अंशांच्या किरकोळ वाढीसह ३३ हजार ८१२.२६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६.६५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी १० हजार ४४२.२० अंशांवर बंद झाला. 

गुंतवणूकदरांना तिमाही निकालांची उत्सुकता लागली आहे. आगामी अर्थसंकल्पाबाबत जाणकारांकडून अंदाज वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये नफावसुली दिसून आली. प्रमुख पायाभूत क्षेत्राच्या वाढीचा फारसा परिणाम बाजारावर दिसून आला नाही. गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य देत नफावसुली केली. टाटा मोटर्स, एनएमडीसी, व्हिडिओकॉन, डीश टीव्ही, अदानी पॉवर, एनटीपीसी, जैन इरिगेशन आदी शेअर वधारले.

Web Title: arthavishwa news sensex stop