अक्कलकोट बसस्थानाकातील संपूर्ण प्रवाशी वाहतूक बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

अक्कलकोट - काल (ता. 2 जाने) अक्कलकोट तालुका मागासवर्गीय कृती समितीच्या वतीने कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे अक्कलकोट बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे अक्कलकोट स्थानकातून पहाटे पाच वाजता सुटणारी अक्कलकोट ते स्वारगेट ही गाडली सोडली गेली आणि त्यानंतर कुठलीच गाडी सोडण्यात आली नाही. कोकणातून मुक्कामी आलेल्या काही गाड्या पहाटे गेल्या. पण इतर गाड्या येथेच आहेत. कर्नाटकातून आळंद, कलबुर्गी व अफजलपूर येथून येणाऱ्या गाड्या सुरक्षेचा उपाय म्हणून अक्कलकोटला येऊ शकल्या नाहीत. सद्यःस्थितीत पूर्ण महामंडळाची प्रवाशी वाहतूक बंद आहे.

अक्कलकोट - काल (ता. 2 जाने) अक्कलकोट तालुका मागासवर्गीय कृती समितीच्या वतीने कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे अक्कलकोट बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे अक्कलकोट स्थानकातून पहाटे पाच वाजता सुटणारी अक्कलकोट ते स्वारगेट ही गाडली सोडली गेली आणि त्यानंतर कुठलीच गाडी सोडण्यात आली नाही. कोकणातून मुक्कामी आलेल्या काही गाड्या पहाटे गेल्या. पण इतर गाड्या येथेच आहेत. कर्नाटकातून आळंद, कलबुर्गी व अफजलपूर येथून येणाऱ्या गाड्या सुरक्षेचा उपाय म्हणून अक्कलकोटला येऊ शकल्या नाहीत. सद्यःस्थितीत पूर्ण महामंडळाची प्रवाशी वाहतूक बंद आहे. सर्व गाड्या आगारात लावण्यात येत आहेत, अशी माहिती अक्कलकोट आगार व्यवस्थापक विवेक हिपळगावकर यांनी दिली आहे. 

तसेच कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे या बंदच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुका मागासवर्गीय कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सराफ बाजार, कापड मार्केट, किराणा व भुसार बाजार, हॉटेल व इतर व्यावसायिक यांनी प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवला आहे. 

Web Title: Marathi News Koregaon Bhima Violence Akkalkot Bus Station Traffic Closure