कोरेगाव भीमाच्या पार्श्वभूमीवर नांदगावमध्ये बंदला प्रतिसाद 

संजीव निकम
बुधवार, 3 जानेवारी 2018

नांदगाव : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील व्यवहार ठप्प झाले होते. त्यातून सकाळी अनेक भागातून दूध पुरवठा झाला नाही. एरवी रेल्वे गेट, शनिमंदिर बस स्टॉप, येवला रोड, साकोरा रोड आदी विविध भागातील राज्यमार्ग व इतर रस्त्यावरून होत असलेल्या प्रवासी व अन्य वाहतुकीवर या बंदचा परिणाम जाणवला टॅक्सी, काळी पिवळी रिक्षा आदी खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने बंदकाळात चालक मालकांनी बाहेर काढलीच नाहीत. त्याचा परिणाम सकाळी सकाळी कामधंद्यासाठी बाहेर पडू पाहणाऱ्या नोकरदार वर्गावर झाला.

नांदगाव : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील व्यवहार ठप्प झाले होते. त्यातून सकाळी अनेक भागातून दूध पुरवठा झाला नाही. एरवी रेल्वे गेट, शनिमंदिर बस स्टॉप, येवला रोड, साकोरा रोड आदी विविध भागातील राज्यमार्ग व इतर रस्त्यावरून होत असलेल्या प्रवासी व अन्य वाहतुकीवर या बंदचा परिणाम जाणवला टॅक्सी, काळी पिवळी रिक्षा आदी खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने बंदकाळात चालक मालकांनी बाहेर काढलीच नाहीत. त्याचा परिणाम सकाळी सकाळी कामधंद्यासाठी बाहेर पडू पाहणाऱ्या नोकरदार वर्गावर झाला. आपापल्या कार्यालयात पोहचण्यासाठी अन्य साधनांचा पर्याय स्वीकारावा लागला. शाळा महाविद्यालयात उपस्थितीवर देखील परिणाम झाला. भाजीपाला मार्केट बंद होते.

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी सुरु होणारे लिलावाच्या वेळेत बदल करून हा लिलाव दुपारनंतर करण्याचा निर्णय खरेदीदार आडते व बाजार समिती व्यवस्थापनाने घेतला, त्यामुळे पहिल्या सत्रासाठी रात्रीपासून लीलालवासाठी आलेल्या तीनशेहून अधिक वाहनांचा खोळंबा झाला. मेडिकल व दवाखाने बंदमधून वगळण्यात आले होते. बस स्थानकातून आज एकही गाडी सुटली नाही. सकाळी नाशिकच्या दिशेने गेलेली नांदगाव आग्रही बस खबरदारीचा उपाय म्हणून मनमाड आगारात जमा करण्यात आली. कामावर आलेल्या चालक वाहकांना बस घेऊन जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या. काल मंगळवारी पुण्याजवळ भोसरीला नांदगाव आगाराच्या बसचे पुण्याहून परतीच्या प्रवासात नुकसान करण्यात आल्याने आज आगार प्रमुखांनी खबरदारी म्हणून उपाय योजना केल्यात रेल्वे माल धक्क्यावरील अनेक खासगी ट्रक मालाक चालकांनी माळ वाहतूक केली नव्हती. दरम्यान सकाळी सहा वाजल्यापासून तरुण आंबेडकर अनुयायांनी दुचाकीवर फेऱ्या मारून या बंद काळात व्यापारी संस्थाने उघडी नाहीत ना यासाठी खातरजमा केली ठिकठिकाणी बंद काळात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. अद्याप अनुचित प्रकारची नोंद नाही. 

Web Title: Marathi news nandgao news koregao bheema riots strike