कोरेगाव भीमाच्या निषेधार्थ अकोला शहरात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

शाळा, महाविद्यालयांना आधीच सुटी देण्यात आली होती. बस सेवा मंगळवारी मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात आली. विविध संघटनांचे युवक रस्त्यावर आल्याने शहरात काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या.

अकोला : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ भारिप-बमसंसह दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद अकोला शहरात सकाळपासूनच दिसून येत आहे.

शाळा, महाविद्यालयांना आधीच सुटी देण्यात आली होती. बस सेवा मंगळवारी मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात आली. विविध संघटनांचे युवक रस्त्यावर आल्याने शहरात काही ठिकाणी किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.

जिल्ह्यात ग्रामीण भागातही बंदचा परिणाम दिसून आला. या बंदमध्ये भारिप-बमसंसह आरपीआय आठवले गट व इतर संघटना सहभागी झाल्या आहेत.

Web Title: Marathi news Akola news bandh in Akola