कोल्हापूरात बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

निवास चौगले
बुधवार, 3 जानेवारी 2018

कोल्हापूर : भीमाकोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूर :भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूरात उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. आंबेडकरवादी कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांच्याकडून वाहनांची तोडफोड सुरु आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली असून स्कूलबस आणि स्कूल व्हॅन बंद ठेवण्यात आल्याने बहुतांशी शाळांना अघोषित सुटी मिळाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला बुधवारी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हापूरात आर. के. नगर नाक्यावर जमावाकडून तोडफोड करण्यात आली. तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाला मारहाण करण्यात आल्याने या बंदला हिंसक वळण लागण्याची चिन्हे आहेत. आंबेडकरवादी कार्यकर्ते पायी आणि दुचाकीवरुन कोल्हापूर बंदचे आवाहन करत शहरातून निषेध मोर्चा काढत आहेत.

Web Title: Kolhapur News Koregao Bheema Riots Strike