रसायनीत कडकडीत बंद 

लक्ष्मण डुबे 
बुधवार, 3 जानेवारी 2018

रसायनी : कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर रसायनी परिसरात बुधवारी (ता. 03) कडकडीत बंद होता. परीसरातील भारिप बहुजन महासंघ, युवा भिमसैनिक रायगड, रिपब्लिकन पक्ष आदिनी बंदचे आव्हान केले होते. तसेच रसायनीतील मुख्य रस्त्यावर भिम सैनिकांनी रस्ता रोको केला.

 रसायनीचे मुख्यालय मोहोपाडा बाजार पेठेतील सर्व तसेच ठिकानच्या व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवली होती. तसेच तीन, सहा आसनी, आणि मालवाहु रिक्षा बंद होत्या. पनवेल, कर्जत, पेण ठिकानी जाणाऱ्या एस टी बस आणि रिक्षा बंद असल्याने मार्गावरून वरील ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. तसेच नेहमी वाहनाच्या वर्दळीत आसणारा दांड पेण या रस्त्यावर मोहोपाडा येथे शुकशुकाट दिसत होता. 

रसायनीतील मुख्य दांड पेण रस्त्यावर पराडे कॉर्नर, मोहोपाडा नाका, दांड फाटा येथे भिम सैनिकांनी रस्ता रोको केला. त्यामुळे पराडे कॉर्नर येथे पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती. रसायनी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Marathi news raigad news rasta roko strike