अभिनयाला सामाजिक कार्याची जोड देण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नाशिक - चित्रपट कलावंतांचे काम करताना आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्यामुळे सर्वच कलावंतांनी नवीन वर्षात अभिनयाबरोबरच फिट राहण्याकडेही लक्ष देणार असल्याचे सांगितले. तसेच समाजाचे आपण काही देणे लागतो, याची जाणीव ठेवून सर्वच कलाकारांनी अभिनयाला सामाजिक कामाची जोड देणार असल्याचे सांगितले. महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती, तिरंग्याचा सन्मान, गोदावरी स्वच्छता, वाहतुकीबाबत जनजागृती अशा विविध उपक्रमांत झोकून देणार असल्याचे कलावंतांनी सांगितले. 

नवीन वर्षाच्या सर्व रसिकांना शुभेच्छा. नवीन जे घडणार आहे ते उत्तम पद्धतीने स्वीकारायचे. घडलेली गोष्ट सकारात्मक दृष्टीने स्वीकारल्यामुळे आनंदाची पातळी कुठेही कमी होत नाही. काहीही घडले तरी आपण छान जगायचे. नवीन वर्षात ब्रह्मगिरी हिरवाईने नटला पाहिजे. गोदामाई जशी पात्रातून खळाळून वाहिली पाहिजे तसेच ती प्रत्येक नाशिककराच्या मनातूनही खळाळली पाहिजे. प्रत्येकाच्या मनात गोदामाई रुजवायची आहे. 
- चिन्मय उदगीरकर, अभिनेता

फिट राहा आणि काम करा, हाच नव्या वर्षाचा संकल्प आहे. वर्षभर दररोज काम करायचे आहे. अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यालाही सुरवात केली आहे. नवीन वर्षात सामाजिक कामालाही बहर आणायचा आहे. गावागावांत जाऊन महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणार आहे. आगामी काळात तीन चित्रपट येणार आहेत. तसेच हिंदी मालिकांमध्येही नवीन वर्षात काम करण्याचा मानस आहे. 
- सायली संजीव, अभिनेत्री 

नवीन वर्षात मायबाप प्रेक्षकांची सेवा करायची आहे. तसेच काही नवीन उपक्रमांवरही काम सुरू आहे. प्रजासत्ताकदिनाला तिरंग्याच्या सन्मानासाठी व्यापक मोहीम उभारणार आहे. दर वर्षी आपल्यातला कलावंत वापरून तिरंग्याच्या सन्मानाचे स्वरूप जास्तीत जास्त कसे व्यापक करता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. नवीन वर्षातही गोदामाईच्या सेवेसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमातही सहभाग असणार आहे. 
- किरण भालेराव, अभिनेता

नव्या वर्षात खूप काम करायचे आहे. फिट राहण्यावर जास्त भर देणार आहे. दोन नवीन चित्रपटांविषयी काम सुरू आहे. वाहतुकीचे नियम मी स्वतः तर पाळतोच पण प्रबोधनाच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोक कसे पाळतील याकडेही लक्ष देणार आहे. गाडी चालविताना आपण फक्त स्वतःचा विचार करतो पण इतरांचाही विचार केला पाहिजे. सर्वांनी एकमेकांचा विचार केला तर कुणालाही त्रास होणार नाही. 
- सुयोग गोरे, अभिनेता

Web Title: nashik news Determination to engage in social work in acting