खामगाव मध्ये बंद शांततेत...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

खामगाव (बुलडाणा): कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला खामगाव येथे आज (बुधवार) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 10 वाजता शहरातून शांती मार्च काढण्यात आला असून, शहरातील शाळा-महाविद्यालयांसोबतच खासगी प्रवासी वाहतूक धारक बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

एसटीसोबतच खासगी प्रवासी वाहतूकही बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दरम्यान, शहरात दोन वाहनाची तोडफोड व काही ठिकाणी दुकानांच्या काच फोडून नुकसान करण्यात आले. तुरळक प्रकार सोडला तर बंद शांततेत सुरू आहे. भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली.

या पार्श्वभूमीवर आज पहाटेपासूनच अत्यावश्यक सेवांसोबतच शहरातील शाळा महाविद्यालय, खासगी प्रतिष्ठाने संपूर्णपणे बंद आहे. स्कूल बस संचालकांनीही स्कूल बसेस बंद ठेवल्या तर मंगळवारी रात्रीपासूनच एसटी बसेस बंद असल्याने बस स्थानकावर शांतता आहे. आज पहाटेपासूनच खामगाव शहरातील पेट्रोलपंपही बंद होते. मुख्य बाजारपेठ, बाजार समिती, सराफा मार्केट बंद होते.दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.किरकोळ स्वरूपात तोडफोड झाली आहे.

Web Title: buldhana news koregaon bhima issue and khamgaon strike