जळगाव जिल्ह्यात बंदने व्यापार बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

जळगाव: कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर आज (बुधवार) जिल्ह्यात तीव्र पडसाद पडले. सकाळपासून व्यापारी संकुल बंद होते. तर दुपार नंतर काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले. यामुळे काहीवेळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्य बंदला जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. व्यापार-उद्योग पूर्णपणे बंद असल्याने बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. काही व्यापार्यांनी दुकाने उघळली असता बंद करण्यास सांगितली जात होती. बंदच्या पार्श्वभूमिवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

भुसावल शहरात आंबेडकरी अनुयायांतर्फे काढलेल्या मोर्चाला जामनेर रोडवर हिंसक वळण लागले. जमावाने नवकार प्लाझासह काही कार्यालयांवर दगडफेक केली. तसेच बसवर दगडफेक केल्याने चार प्रवासी जखमी झाले. दगडफेकीत बसच्या काचा फुटल्या. बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

आज सकाळी 11 पासून लिंपस क्‍लब पासून आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा निघाला. रिपाइंचे राजू सूर्यवंशी, जगन सोनवणे, रमेश मकासरे, उल्हास पगारे, शरद सोनवणे, लक्ष्मण जाधव, मुन्ना सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. प्रांताधिकारी कार्यालयाजवळून हा मोर्चा लोखंडी पुलाखालुन जामनेर रोडवर आला असता पांडुरंग टॉकीजजवळील थांब्यावर आलेल्या बसवर काही मोर्चेकऱ्यांनी दगडफेक केली. यात दोन महिलांसह चार प्रवासी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी धाव घेत जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. पुढे नवकार प्लाझा आणि बॅंकेच्या कार्यायावर दगडफेक केल्याने काचा फुटल्या.

Web Title: jalgaon news koregaon bhima issue and jalgaon band