नाशिकमधील बससेवा ठप्प; शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नाशिक : भीमा कोरेगाव येथील तणावानंतर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये प्रतिसाद मिळाला आहे. बहुतांश व्यापारी बाजारपेठा आज बंद असून नाशिकमधून जिल्हांतर्गत व जिल्हाबाहेर जाणाऱ्या बसगाड्यादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. सीबीएस, द्वारका, सिडको, सातपूर परीसरात आंदोलनकर्त्यांचा जमाव असल्याने परीसरात काहीसे तणावाचे वातावरण जाणविले. महत्त्वाचे काम असेल तरच या परीसरातील नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे केले आहे. 

पोलिस प्रशासनाचे आदेश प्राप्त होईपर्यंत बसफेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळातर्फे घेतला आहे. त्यामूळे सर्व बसगाड्या आगारात, बसस्थानकांवर उभ्या करण्यात आल्या आहेत. शहर वाहतूक बसगाड्यादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. मोठ्या ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या गाड्या रस्त्यावर दिसल्या नाहीत. या उलट लहान व्हॅन व्यवसायिक धुळे, सटाणा यांसारख्या मार्गांवर जादा पैसे आकारुन प्रवासी वाहतूक करत होते. बस बंदमुळे काही प्रवाश्‍यांनी नाशिकरोड रेल्वेस्थानक गाठले. परंतु तेथेही हाती निराशा आली होती. दरम्यान बंदच्या घोषणेमुळे व्हॅन, स्कूलबस बंद ठेवण्यात आल्याने शाळांच्या उपस्थितीवरही परीणाम जाणविला. काही पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्याचे टाळले. शहरातील शिवाजीरोड, महात्मा गांधी मार्ग, मेन रोडसह अन्य प्रमुख बाजारपेठांतील दुकाने बंद राहिली. 

सीबीएस परीसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परीसरात आंदोलनकर्त्यांचा जमाव एकवटत होता. परंतु पोलिसांनी परीस्थिती संवेदनशीलपणे हाताळतांना कुठलाही अनर्थ होऊ दिला नाही. द्वारका येथेही आंदोलनामुळे वाहतुक व्यवस्था विस्खळीत झाली होती. पर्याय म्हणून उड्डाणपुलावरुन वाहतुक वळविण्यात आली होती. तणावाच्या पार्श्‍वभुमिवर पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Web Title: marathi news Koregaon Bhima riots Pune Riots Nashik news