राज्यसभेसाठी 'आप'कडून 'या' तिघांना उमेदवारी

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जानेवारी 2018

'आप'कडून उमेदवारांची निवड करण्यासाठी विविध क्षेत्रातील 18 दिग्गज व्यक्तींच्या नावांचा विचार केला गेला. त्यानंतर आज अखेर या तिघांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आणि आम आदमी पक्षाकडून संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी तीन नावांची घोषणा करण्यात आली. सुशील गुप्ता, संजय सिंह आणि एन. डी. गुप्ता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यसभेतील तीन जागा आम आदमी पक्षाला मिळणार आहेत. त्यानुसार यासाठी आपकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आज (बुधवार) आपकडून या नावांची घोषणा करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या घरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर सिसोदिया यांनी ही माहिती दिली. 

दरम्यान, 'आप'कडून उमेदवारांची निवड करण्यासाठी विविध क्षेत्रातील 18 दिग्गज व्यक्तींच्या नावांचा विचार केला गेला. त्यानंतर आज अखेर या तिघांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
 

कोण आहेत उमेदवार :

1) नारायण दास गुप्ता : आपचे चार्टर्ड अकाऊंटंट

2) सुशील गुप्ता : ट्रस्ट चालवतात

3)  संजय सिंह : आपचे संयोजक

Web Title: marathi news national politics news Aam Aadmi Partys Aap Rajya Sabha Nominees Announces Manish Sisodia