'महाराष्ट्र बंद' मागे- प्रकाश आंबेडकरांची घोषणा

बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई- कोरेगाव भीमा दंगलीनंतर पुकारण्यात आलेला 'महाराष्ट्र बंद' मागे घेत असल्याचे भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घोषित केले.
या प्रकरणातील दोषींना सरकारने लवकर अटक करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

प्रकाश आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे- 

  • महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन आणि आभार. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या बद्दल त्यांना धन्यवाद.
  • हिंदूत्ववाद्यांनी भीमा कोरेगाव येथे घात केला आहे. यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि तिसरे नाव होते घुगे. त्यांचे पहिले नाव अजून कळालेले नाही.
  • भीमा कोरेगाव येथे जो हिंसाचार घडवून आणण्यात आला होता त्यामागे भिडे आणि एकबोटे होते. ज्या प्रमाणे याकूब मेमन याचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी त्याला शिक्षा झाली तशीच भूमिका या दोघांची होती.
  • साडेतीन लाख लोक भीमा कोरेगाव येथे आले होते, हा आकडा मुख्यमंत्र्यांनीच दिलेला आहे.
  • सणसवाडी येथे हजारोंच्या संख्येने अभिवादन करण्यासाठी आलेल्यांवर हल्ला झाला. दगडफेक झाली. शेकडो गाड्या जाळून टाकण्यात आल्या.
  • जो न्याय याकूब मेमनला तोच भिडे आणि एकबोटेंना लावा.
  • सुप्रीम कोर्टाने याकूब मेमन प्रकरणात जो रेषो लावला होता तोच या प्रकरणात लावला जावा आणि भिडे व एकबोटेला अटक करुन त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
  • लोकांनी आता निर्णय घेतला पाहिजे की त्यांना शांततेचे राज्य हवे आहे की अराजकाचे राज्य हवे.
  • सरकारने, पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे तेही बंद करावे.
Web Title: esakal marathi news Prakash Ambedkar Withdraws Call For Bandh