जवानांची हत्या हा त्यांचा अपमान : मुलायमसिंह

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जानेवारी 2018

पाकिस्तान आपल्या देशातील जवानांची हत्या करत आहे. त्यामुळे हा देशातील लष्कराचा अपमान आहे. ही किरकोळ बाब नाही. दहशतावाद्यांशी लढताना लष्काराला मुक्तता दिली जात नाही, अशी मला माहिती मिळत आहे. मात्र, आता लष्कराला मुक्त हाताने कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे. 

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी शहीद जवानांबाबत बुधवारी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''दहशतवादी हल्ल्यात जवानांची हत्या हा त्यांचा अपमान आहे, दहशतवाद्यांशी लढण्यासाठी त्यांना मुक्तता दिली पाहिजे''.  

लोकसभेत त्यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आपले जवान जगात सगळ्यात उत्तम आहेत. मात्र, पाकिस्तान आपल्या देशातील जवानांची हत्या करत आहे. त्यामुळे हा देशातील लष्कराचा अपमान आहे. ही किरकोळ बाब नाही. दहशतावाद्यांशी लढताना लष्काराला मुक्तता दिली जात नाही, असे मला वाटते. मात्र, आता लष्कराला मुक्त हाताने कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची गरज आहे. 

दरम्यान, लष्करात जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाहीत, असे वक्तव्य भाजप खासदार नेपालसिंह यांनी केले होते.

Web Title: marathi news national politics Killing of soldiers in terror attacks an insult says Mulayam Singh Yadav