रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला 

अमित गवळे
बुधवार, 3 जानेवारी 2018

पाली : रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मागील काही दिवसांपासून पडलेल्या गुलाबी थंडीचे रुपांतर आता कडाक्याच्या थंडीत झाले आहे. जिल्ह्यात किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली घसरले असून कमाल तापमान २५ अंशावर आले आहे. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत आहे. बुधवारी (ता. ३) मुंबई गोवा महामार्गावर दाट धुके पसरले होते. त्यामुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु होती

तापमानात कमालीची घसरण झाल्याने वाढत्या गारठ्यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी सकाळी व संध्याकाळी लोक शेकोटी भोवती जमा झालेले दिसत आहेत. वाढत्या थंडीबरोबरच जिल्ह्यात धुके आणि धुरक्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी सर्दी, खोकला हे साथीचे आजार बळावत असल्याने थंडीमध्ये आरोग्याची काळीजी घेण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिली आहे. भिरा येथे बुधवारी (ता. ३) किमान १५ अंश सेल्सिअस तर कमाल ३२ अंश सेल्सिअस तर अलिबाग येथे किमान १७ अंश तर कमाल २७ अंश तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत जिल्ह्यात तापमानाचा पारा अजून खाली उतरण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी (ता. ३) पसरलेल्या दाट धुक्यामुळे वाहतुक धिम्या गतीने सुरु होती. इंदापुर पासून माणगाव पर्यंत तर अक्षरशः धुक्याने काळोख केला होता. हे धुके सकाळी उशिरापर्यंत असेच पसरले होते.

Web Title: Marathi news raigad news extreme low temperature