बाळापूर तालुक्यात आंदोलकांची अटक आणि सुटका

 अनिल दंदी
बुधवार, 3 जानेवारी 2018

राष्ट्रीय महामार्ग, राज्य व जिल्हा मार्गावरील अनेक गावांतील भीमसैनिकांनी चक्काजाम आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तालुक्यातील निंबा फाटा चौकात आंदोलनकर्त्यांना उरळ पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सुटका केली.

बाळापूर : कोरेगाव भिमा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी आज बुधवारी (ता. 3) भारिप बहुजन महासंघाने पुकारलेल्या बंदचे तालुक्यात पडसाद उमटले. राष्ट्रीय महामार्ग, राज्य व जिल्हा मार्गावरील अनेक गावांतील भीमसैनिकांनी चक्काजाम आंदोलन करत निषेध व्यक्त केला. तालुक्यातील निंबा फाटा चौकात आंदोलनकर्त्यांना उरळ पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सुटका केली.

महाराष्ट्र बंदचे आवाहन असतानाही राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा परिसरातील कारखाने व औद्योगिक वसाहती सुरू असल्याने रिधोरा येथील भीमसैनिकांनी बंद करण्याची विनंती केली.

बाळापूर शहरासह तालुक्यातील वाडेगांव, पारस, हातरुण, उरळ, निंबाफाटा यांसह अनेक गावांत कडकडीत बंद पुकारण्यात आला. बाळापूर शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला. दुकानदार, व्यापारी, हॉटेल, शाळा, महाविद्यालय बंद राहिल्याने सकाळपासून रस्त्यावर तूरळक वाहतूक सुरू होती. त्यामुळे रास्तारोकोचा फारसा परिणाम झाला नाही. 

व्याळा येथील बौद्ध बांधवांनी शांतता रॅलीचे आयोजन करून निषेध नोंदविला. अंदुरा, मोरगांव (सादीजन) उरळ,निमकर्दा, शेळद, खामखेड यासह काही गावात रास्तारोको करण्यात आला. काही गावातील बौद्ध बांधवांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदने दिले.

दरम्यान, या बंद काळात सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. 

Web Title: marathi news local news akola news police arrested agitators and release them