ठाण्यातील नौदल तळावर काश्मिरी तरुणाची घुसखोरी

दीपक शेलार
बुधवार, 3 जानेवारी 2018

नौदलाच्या हायसिक्युरिटी भिंतीलगत झाडीमध्ये लपलेला शौकत सैद जेरबंद

ठाणेः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असतानाही ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर काश्मिरी तरुणाने घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शौकत अहमद कासम खटानन सैद (35) असे त्या काश्मिरी तरुणाचे नाव असून, नौदलाच्या हायसिक्युरिटी भिंतीनजिकच्या झाडीत तो लपून बसला होता. याप्रकरणी, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचा गुन्हा नौदल विभागाने कापुरबावडी पोलिसात दाखल केला असून, पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

ठाण्यातील कोलशेत येथे भारतीय संरक्षण दलाचे हवाई आणि नौदल तळ आहेत. या क्षेत्रालगतचा परिसर सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र असून याठिकाणी 24 तास देखरेख सुरु असते. मंगळवारी (ता. 2) रोजी पहाटे 4 ते 8 या कालावधीत नौदलाच्या जेटी गेटजवळ कर्तव्यावर असलेले शिपाई नंदराम यांना गस्तीदरम्यान नौदलाच्या हायसिक्युरिटी भिंतीजवळील झाडीत संशयास्पदरित्या एक तरुण लपून बसल्याचे आढळले. ही बाब त्यांनी नौदलाचे लीडिंग पेट्रोलमेन संपतकुमार सेठी यांना कळवून त्याला ताब्यात घेत चौकशी केली.

अंगावर मळके कपडे आणि दाढी व केस वाढलेल्या अवस्थेत आढळलेल्या या तरुणाने, आपले नाव शौकत सैद असून आपण जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील अनंतनाग तालुक्यातील गावातील शेतकरी असल्याचे सांगितले. ठाण्यात येण्याच्या प्रयोजनाबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने सेठी यांनी कापुरबावडी पोलिसांना कळवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक बी.सी.वंजारी करीत आहेत.

Web Title: thane news Kashmiri youth infiltrated at Thane naval base