काश्‍मिरी घुसखोराला ठाण्यात अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

ठाणे - कडेकोट बंदोबस्त असतानाही ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर काश्‍मिरी तरुणाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

ठाणे - कडेकोट बंदोबस्त असतानाही ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर काश्‍मिरी तरुणाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

शौकत अहमद कासम खटानन सैद (35) असे त्याचे नाव असून, नौदल तळाच्या संरक्षक भिंतीनजीकच्या झाडीत तो लपला होता. या प्रकरणी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. कोलशेत येथे भारतीय संरक्षण दलाचे हवाई आणि नौदल तळ आहेत. या क्षेत्रालगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र असून, या ठिकाणी 24 तास देखरेख असते. मंगळवारी (ता. 2) पहाटे जेटी गेटजवळ झाडीत शौकत लपल्याचे दिसले. नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

Web Title: thane news crime Kashmir

टॅग्स