"मेट्रो'लाही बंदचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई - महाराष्ट्र बंददरम्यान आंदोलकांनी मेट्रो रेल्वेही बंद पाडली. त्यामुळे मेट्रोला प्रथमच बंदचा फटका बसला. 

मुंबई - महाराष्ट्र बंददरम्यान आंदोलकांनी मेट्रो रेल्वेही बंद पाडली. त्यामुळे मेट्रोला प्रथमच बंदचा फटका बसला. 

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणाऱ्या "मेट्रो'ची सर्व नैसर्गिक-मानवनिर्मित अडचणींमधून मार्ग काढणारी अशी ख्याती आहे; मात्र तिलाही बंदचा फटका बसला. आंदोलकांनी दुपारी 12.15 च्या सुमारास घाटकोपर स्थानकात जाऊन मेट्रो रोखली. "मेट्रो'मध्ये प्रवाशांना अडवणारी अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्या अडथळ्यांवरून उड्या मारून आंदोलक आत गेले. तेथे पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांचे फावले. त्यांनी थेट रुळांवरच उडी मारली. त्यानंतर "मुंबई मेट्रो'ने सुरक्षेच्या कारणास्तव घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंत सेवा बंद केली. एअरपोर्ट रोड ते वर्सोव्यापर्यंत सेवा सुरू होती. 

आंदोलक "मेट्रो'च्या असल्फा स्थानकातील रुळांवरही उतरले होते. त्यामुळे वर्सोव्याकडे जाणारी मेट्रो तेथे जवळपास 10 मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. मेट्रो सुरू झाल्यापासून प्रथमच अशा प्रकारे रोखली गेली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मेट्रोची सेवा विस्कळित होती. संध्याकाळी बंद मागे घेतल्यावरच ही सेवा पूर्ववत झाली. 

Web Title: mumbai news metro Maharashtra Bandh Koregaon Bhima Clash