वंदे भारत मिशन -  माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय प्रवास

अनिता गोखले
Thursday, 21 May 2020

मी अमेरिकेत जायचे ठरवले होते त्याप्रमाणे ३ मार्च २०२० ला अमेरिकेत पोहोचले. आणि ४ मार्च ला कोरोना व्हायरस प्रकरणाला यूएस मध्ये सुरुवात झाली .माझे परतीचे तिकीट ७ मे चे होते, परंतु भारतात २२ मार्च पासूनच लॉकडाउनचे चक्र चालू झाले. ते संपण्याची काहीही लक्षणे दिसेनात. माझे ७ तारखेचे तिकीट पण रद्द झाले. चौकशी करता सर्व अनिश्चित, परतीचे सर्व मार्ग बंद. भारतात बाहेरील विमाने यायला परवानगी नाही. आता मी भारतात परत कशी जाणार याची काळजी पडली कारण भारतातील एअरलाईन चालू होईपर्यंत जर अमेरिकेने त्यांची बॉर्डर बंद केली तर काय?

मी अमेरिकेत जायचे ठरवले होते त्याप्रमाणे ३ मार्च २०२० ला अमेरिकेत पोहोचले. आणि ४ मार्च ला कोरोना व्हायरस प्रकरणाला यूएस मध्ये सुरुवात झाली .माझे परतीचे तिकीट ७ मे चे होते, परंतु भारतात २२ मार्च पासूनच लॉकडाउनचे चक्र चालू झाले. ते संपण्याची काहीही लक्षणे दिसेनात. माझे ७ तारखेचे तिकीट पण रद्द झाले. चौकशी करता सर्व अनिश्चित, परतीचे सर्व मार्ग बंद. भारतात बाहेरील विमाने यायला परवानगी नाही. आता मी भारतात परत कशी जाणार याची काळजी पडली कारण भारतातील एअरलाईन चालू होईपर्यंत जर अमेरिकेने त्यांची बॉर्डर बंद केली तर काय?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काही सुचत नव्हते. तशी मला काही राहण्याची काळजी नव्हती कारण मी मुलीकडे होते. पण, तिचा विसा संपत आला होता त्यामुळे काय करावे असा विचार आणि चिंता करत होते. तोपर्यंत आदरणीय मोदीजींनी वंदे भारत मिशन योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत सर्व परदेशी अडकलेल्या भारतीयांना भारतात परत आणणार अशी बातमी वाचली. त्यामुळे आशेचा एक किरण दिसला. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एम्बसी मार्फत फॉर्म भरला आणि त्यांचे त्वरित उत्तर आले. अतिशय तत्पर सेवा. तरीपण धडधड होतीच कारण ड्रॉ पद्धतीने नंबर काढणार होते.पण नशिबाने साथ दिली आणि तिथूनच नाट्यमय प्रसंगाला सुरुवात झाली.

Image may contain: 1 person, close-up and outdoor

७ मे ला दुपारी कॉन्सुलेट मधून फोन आला.भारतात जाण्याच्या यादीमध्ये तुमचे नाव आलेले आहे. तुमची यायची तयारी आहे ना? पण तेव्हा हे माहिती नव्हते की, किती तारखेला जायला लागणार आहे. ७ मे लाच दुपारी ५ वाजता त्यांची मेल आली की ९ मेला रात्री अकरा वाजता सॅनफ्रान्सिस्को-इंडिया अशी फ्लाईट आहे आणि येणार असाल तर लगेच सात वाजेपर्यंत कळवा. तुम्ही येऊ शकणार नसाल तर तुमचा नंबर दुसऱ्या कुणाला तरी देण्यात येईल...यावेळी मी सिएटल मध्ये राहत होते. मग सिएटल पासून सॅनफ्रान्सिस्को ला फ्लाईट जात आहेत का हे पाहिले आणि मी येणार आहे असे कळवले. 

सॅनफ्रॅन्सिस्को ला आम्ही दुपारी बारा वाजताच पोचलो. सर्व विमानतळ रिकामा होता. संध्याकाळी सहानंतर अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागातून जवळजवळ तीनशे लोक विमानतळावर आली. एअरइंडियाचा स्टाफ आला. त्यांनी सहा वाजल्यापासून लोकांचे थर्मल चेकिंग करायला सुरुवात केली.नंतर चेक इन ला सुरुवात केली. नंतर बोर्डिंग ला सुरुवात झाली विमानात तीनशे माणसे होती. प्रत्येकाची काहीतरी अडचण होती.

काहीजणांचे सहा महिने संपले होते तरी लॉक डाऊन मुळे परत जाता आले नव्हते. काही जणी प्रेग्नेंट होत्या. बरेच विद्यार्थी होते, २० मार्च पासून कॉलेज बंद असल्यामुळे यूएस मध्ये राहणे अवघड झाले होते. खर्च वाढत होता आणि पैसे नव्हते. तर काही आया माझ्यासारख्या! सर्वजण घरी जाण्यासाठी उत्सुक पण त्यामुळे विमानात सोशल डिस्टन्ससिंग ठेवणे अवघड होते. त्यामुळे सर्वजण कंपल्सरी मास्क आणि हॅन्ड ग्लोज घालून त्यातल्या त्यात स्वतःची काळजी घेत होते. विमानात बोर्डिंग करताना परत प्रत्येक प्रवाशाचे थर्मल चेकिंग झाले. एअर इंडियाने आधीच सांगितल्याप्रमाणे जेवण आणि स्नॅक्स असे कोरडे पदार्थ जे दोन वेळा जेवणासाठी वापरता येतील असे पॅकेट बांधून प्रत्येक प्रवाशाच्या सीटवर ठेवले होते. त्याच प्रमाणे एक मास्क सैनीटायझर ची बाटली आणि पाण्याच्या दोन बाटल्या ठेवल्या होत्या.थोडी गैरसोय होणार होती तरी पण प्रत्येक जण आपल्याला परत आपल्या देशात जायला मिळणार ह्या आनंदात होता. मोदीजींना धन्यवाद देत होता. त्यांच्यामुळे घरी परत जाणे शक्य झाले ही भावना सगळ्यांच्या मनात होती. आणि यासाठी पूर्ण भारतीय यंत्रणा पण कार्यरत होती. एम्बसी मधील सर्व स्टाफ, डॉक्टर्स, एअर इंडिया चा स्टाफ, पोलीस यंत्रणा, सरकारी ऑफिसर्स एकाच ध्येयाने प्रेरित होऊन काम करत होते. आपली माणसे घरी कशी नेता येतील यासाठी झटत होते.

सुमारे 18 तासांचा प्रवास करून आम्ही मुंबईला उतरलो. आता पुढील दिव्य प्रत्येकाला विलगीकरणात राहायला लागणार होते. प्रत्येक जण पुढे काय होणार या विचारात होता. मुंबई ला उतरल्यावर मुंबई मध्ये पंधरा दिवस राहायला लागणार आणि मग आपापल्या गावी जायला मिळणार आणि ते पण जाता येईल का? सर्व रस्ते बंद असतील तर कसे जाणार? असे प्रश्नांचे डोंगर उभे होते. आम्ही मुंबईला उतरलो. इमिग्रेशनचे शिक्के पासपोर्टवर मारून बाहेर आलो आणि आश्चर्याचा  सुखद धक्काच बसला. बाहेर पहाटे पाच वाजता पोलीस स्वागताला उभे होते .परत तिथे सर्वांचे थर्मल चेकिंग झाले आणि आरोग्य सेतू मोदीजींनी डाउनलोड करायला सांगितले होते ते प्रत्येक प्रवाशाने डाउनलोड केले आहे की नाही याचे चेकिंग झाले. ज्यांनी डाउनलोड केले नव्हते त्यांना तिथे करायला लावले.

बाहेर येउन पाहीले तर बाहेर पुणे, ठाणे, नाशिक नागपूर ,अमरावती, जळगाव ,सोलापूर, सांगली ,सातारा अशा वेगवेगळ्या शहरांची नावे घातलेले बोर्ड घेऊन आणि त्याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची यादी घेऊन पोलीस उभे होते. या गावांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसेसची सोय केली होती. आणि त्या मुळे आमच्या पुढे असलेली सर्व संकटे दूर झाली बस ची सुविधा नसती तर प्रत्येकास आपल्या गावी जायची सोय आपली आपण करावी लागली असती. प्रत्येकाला आपापल्या गावी जाऊन विलगीकरणात राहायचे आहे असे सांगण्यात आले .त्यामुळे सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला. आपापल्या गावी जाऊन विलगीकरणात राहणे म्हणजे टेन्शनच गेले. तिथेही विलागिकरण करण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशा हॉटेल्सची निवड केली होती. त्या मुळे तो पण त्रास सहन करावा लागला नाही अशा तऱ्हेने आमचा हा प्रवास सुखद झाला. या सर्व अभियानासाठी लागलेले मदतीचे हात होते.

मग ते म्हणजे एअर इंडियाचे कर्मचारी असोत, एअरपोर्टचा स्टाफ असो, आपल्या एम्बासी मधील लोक असोत, पोलीस असोत, आम्हाला घेऊन जाणारे एसटीचे कर्मचारी असोत, सरकारी ऑफिसर असोत, डॉक्टर्स असोत. या सर्वांच्या सहकार्या मुळे आम्हाला कोणताही त्रास सहन करावा लागला नाही. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. या सर्वांना माझा मनापासून मानाचा मुजरा आणि सलाम. वंदे भारत मिशन द्वारे अशाच आणखी फ्लाइट घेऊन इतर परदेशस्थ लोकांना पण आपापल्या घरी यायला मिळो ही सदिच्छा. आपल्या देशातील परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्याची ही तळमळ, त्यासाठी केलेले अथक प्रयत्न पाहून मन भरून आले आणि मी भारतीय असल्याचा मला अभिमान वाटला. मेरा भारत महान! जय हिंद! जय भारत!
- अनिता गोखले, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anita gokhale writes blog about vande bharat mission