नेदरलॅंडमध्ये लॉकडाऊन नाही; टेस्टिंगची पद्धतही वेगळी!

ऋतुजा कदम
Sunday, 12 April 2020

देशातील कोरोना रुग्णांचे आकडे हे वाढत आहेत, तो झपाट्याने वाढण्याचा वेग मात्र कमी आहे.सरकार त्यावर कठोरतेने आणि चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहे. 

मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही सॉफ्ट इंजिनिअर आहोत. साहजिकच कंपनीचे क्लाएंट मंडळी ही वेगवेगळ्या देशाची असल्याने अगदी जानेवारीपासूनच कोरोना व्हायरसविषयीची माहिती आम्हाला माहित होती. इतर कोण्या साथीप्रमाणेच हा आहे असं जरी सुरुवातीला चीनकडून सांगण्यात आलं होतं तरी, हे साधारण नाही हे पहिल्यापासून जाणवत होतं. नेदरलॅंडमध्ये कोरोनाची लागण सुरु झाल्यावर सर्वांत आधी सरकारने पहिला एक आठवडा या सर्वांची पाहणी केली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताप्रमाणे इथे लॉकडाऊन नाही पण, इथे त्याला Partial Lockdown म्हणतात. जास्तीत कंपन्यांना हे वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. मात्र सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स आणि असे इतर काम करीतच आहेतच. संपूर्णपणे लॉकडाऊन हा नाही. जगातील अनेक देश हे टेस्टिंग करण्यावर भर देत आहेत. तिथे या परिस्थितीशी नेदरलॅंड वेगळ्या पद्धतीने हाताळत आहे. सहसा काही देश सरसकट सर्व नागरिकांची टेस्ट करताना दिसत आहेत. मात्र इथे ज्यांना सर्दी, तापाची लक्षणे आहेत त्यांना पहिले पाच दिवस हे घरी राहण्यास सांगितले जाते. त्यानंतर सहाव्या दिवशी कोरडा खोकला किंवा श्वासोच्छवासामध्ये अडचण येत असल्यास मगच डॉक्टरांकडे जाऊ शकता. त्यानंतरच तुमची टेस्ट करण्यात येते.

Image may contain: 2 people, sky, cloud, sunglasses, outdoor, close-up and nature

नेदरलॅंडमध्ये टेस्ट करण्याचे प्रमाण हे कमी आहेच. इथली वैद्यकिय प्रणाली ही (conservative)हात राखून काम करणारी आहे. ज्यांना त्याची सर्वाधिक गरज आहे त्यांना ती मिळावी असा त्या मागचा विचार आहे.

सहसा इथे लोकांचाही दृष्टीकोन तसाच आहे. साधा ताप, सर्दा किंवा खोकला असल्यास आपल्याकडे डॉक्टरकडे धाव घेतली जाते. मात्र इथेसुरुवातीलाच औषधे न घेता नैसर्गिकरित्या बरा होण्यावर भर दिला जातो. इटलीमधील केसेस या झपाट्याने वाढत होत्या. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याचवेळी नेदरलॅंडमधील अनेक लोक इटलीमध्ये वेकेशनसाठी गेले होते. ते परतल्यावर इथल्या केसेस वाढल्या. नॉर्थ ब्राबंट इथल्या तर केसेस खूप वाढल्या. हा आकडा दिवसागणिक वाढत होता. त्यानंतरच देशाने सोशल डिस्टन्सिंग करण्यावर भर दिला. त्याचसोबत पहिल्यांदा सर्व शाळा, कॉलेज हे बंद करण्यात आले. मात्र अभ्यास थांबलेला नाही ‘हाऊस स्कूलिंग’ हे सुरुच आहे. रोजचा अभ्यास आणि प्रोजेक्ट्स हे ऑनलाईन मुलांना दिले जातात. पार्थशियल लॉकडाऊन असल्याने बाहेर जाण्यावर बंधने नाहीत. मुलांना घेऊन, गाडी घेऊन किंवा तुमच्या पाळीव प्राण्यांना घेऊन बाहेर जाऊ शकता मात्र दीड ते दोन मीटरचं अंतर हे राखणं गरजेचं आहे. इथल्या नियमांचे पालन नागरिक काटेकोरपणे करतात. त्यामुळे एकुणच कोरोना सारख्या संकटाशी दोन हात करताना लोक त्याचा बाऊ न करता जबाबदारीने पार पाडत आहेत.नुकत्याच घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता एकत्र जमावावर बंदी आणली आहे.सरकार ‘हर्ड इम्युनिटी’ तयार करण्यावर भर देत आहेत. त्या दृष्टीने वैद्यकिय प्रणीलीचे प्रयत्नही सुरु आहेत.देशातील कोरोना रुग्णांचे आकडे हे वाढत आहेत, तो झपाट्याने वाढण्याचा वेग मात्र कमी आहे.सरकार त्यावर कठोरतेने आणि चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहे. 

पाकिस्तानच्या सिंधूची इटलीतून ई-सकाळला विशेष मुलाखत; काय सांगते सिंधू?

स्नेहल आणि श्रीनिवास गंधे, नेदरलॅंड

शब्दांकन : ऋतुजा कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus snehal shriniwas gandhe netherlands lockdown interviews rutuja kadam